Pune Crime | पुण्यात जांभूळवाडी दरीपुलाजवळ दगडाने ठेचून तृतीयपंथीचा खून, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) जांभूळवाडी दरीपूलाजवळ एका तृतीयपंथीचा (transgender) मृतदेह (Dead body) आढळून आला आहे. हा प्रकार आज (मंगळवार) सकाळी दरीपूलाजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या (Indian Oil Petrol Pump) शेजारील रस्त्यावर उघडकीस आला आहे. सागर उर्फ सारिका उजागरे (वय-25 रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) असे खून (Murder) झालेल्या तृतीयपंथीचे (Murder of Transgender in Pune) नाव आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर महामार्गावर एका तृतीयपंथीचा मृतदेह आढळून आला आहे. आठवड्याभरात दोन तृतीयपंथीचा (Pune Crime) खून झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉक (Morning walk) करण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला. नागरिकांनी घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला (police control room) दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (bharti vidyapeeth police station) पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

 

एका तृतीयपंथी व्यक्तीचा मृतदेह दगडावर पडलेला आढळून आला.
डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव (Pune Crime) झाला होता.
दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी (post-mortem) पाठवून दिला.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.

 

Web Title :- Pune Crime | body of transgender found near jambulwadi valley bharti vidyapeeth police satiaon pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा