Pune Crime | पठाणकोट येथील गुन्ह्यात फरार असलेल्या बोगस आर्मी ऑफिसरला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आर्मीमध्ये नोकरी (Job in Army) लावण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या बोगस आर्मी ऑफिसरला (Fake Army Officer) (कर्नल) मिलेट्री इन्टेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीवरून पुणे गुन्हे शाखा युनिट चारच्या (Pune Crime Branch Unit 4) पथकाने अटक (Arrest) केली आहे. संजय रघुनाथ सावंत Sanjay Raghunath Sawant (वय – 55 रा. बोपोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पंजाब मधील पठाणकोट येथील अनेकांची फसवणूक (Fraud) केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार असून पंजाब पोलीस (Punjab Police) त्याचा शोध घेत होते.

 

बोगस अधिकारी बनुन संजय सावंत याने पठाणकोट येथे आर्मी मध्ये नोकरीस लावतो असे सांगून अनेक उमेदवार आणि पालकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती. या गुन्ह्यात सावंत हा पाहिजे आरोपी असल्याची माहिती आर्मी इंटेलिजन्सने (Army Intelligence) गुन्हे शाखा युनिट चारला दिली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी युनिट चार आणि मिलेट्री इंटेलिजन्स यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली होती. (Pune Crime)

 

आरोपी संजय सावंत याचा पत्ता आणि माहिती मिळत नसल्याने तो सापडत नव्हता. दरम्यान, युनिट चारच्या पथकाला संजय सावंत हा देहुरोड येथील डीओडी डेपो (Dehu Road DOD Depot) येथे लेबर म्हणून नोकरी करत होता अशी माहिती मिळाली. तसेच तो दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाला असून सध्या तो पिंपळे गुरव येथे राहत असून रिक्षा चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आठ दिवस 150 ते 200 रिक्षांची तपासणी करुन आरोपीचा शोध घेतला.

युनिट चारचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी मंगळवारी (दि.9) पठाणकोट पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली. पठाणकोट पोलिसांचे (Pathankot Police) पथक पुण्यात आल्यानंतर स्थानिक आर्मी इंटेलिजन्सच्या व युनिटच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. सखोल चौकशी मध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पठाणकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar),
पोलीस सहायक निरीक्षक विकास जाधव (API Vikas Jadhav) पोलीस अंमलदार राजस शेख, संजय आढारी,
प्रविण भालचीम व आर्मी इंटेलिजन्स यांच्या संयुक्त पथकाने केली.

 

 

 

Web Title : –Pune Crime | Bogus army officer who is absconding in Pathankot crime case arrested by pune police crime branch

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा