Pune Crime | मुंबई पोलीस दलात पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया महिला पोलिसाला अटक

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | संशयित आरोपीचा शोध घेत असताना आरोपीचा भाऊ संतोष गंगाधर पोटभरे (Santosh Gangadhar Potbhare) याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या (MIDC Bhosari Police Station) आवारात गोंधळ घातला. तसेच आपली पत्नी पोलीस असल्याचे सांगून पोलीस आयुक्तांकडे (Police Commissioner) तक्रार करण्याची धमकी (Threat) दिली. तर कविता प्रकाश दोडके (Kavita Prakash Dodke) या महिलेने पोलिसांचा गणवेश (Police Uniform) घालून मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात असल्याचे सांगून सरकारी कामात अडथळा निर्माण (Pune Crime) केला. पोलिसांनी तोतया महिला पोलिस (Bogus lady Police) आणि संतोष पोटभरे यांना बेड्या ठोकल्या आहेत.

 

याबाबत पोलीस शिपाई भागवत संदीपान शेप Bhagwat Sandipan Shep (वय – 29) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष पोटभरे (वय – 24 रा. बालाजीनगर, भोसरी) आणि कविता दोडके (वय-  27 रा. मोहननगर, चिंचवड) यांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.8) रात्री साडेआठ ते पावणे नऊ या दरम्यान एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या आवारात घडला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे संशयित आरोपी बाळू गंगाधर पोटभरे (Balu Gangadhar Potbhare) याचा बालाजीनगर परिसरात शोध घेत होते. त्यावेळी आरोपी संतोष पोटभरे याला बाळू पोटभरे कोठे राहतो अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने घर दाखवतो असे सांगून फिर्यादी यांच्या पाठिमागे चालत असताना गल्ली बोळातून पळून गेला. फिर्यादी यांनी संतोष याच्या बाबत नागरिकांकडे चौकशी केली असता संशयित आरोपी बाळू पोटभरे याचा तो भाऊ असल्याचे समजले.

 

फिर्यादी यांनी त्याला फोन करुन बाळू कोठे आहे अशी विचारणा केली असता त्याने उलट सुलट उत्तरे दिली. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालून माझी होणारी पत्नी पोलीस असून तुमच्या विरुद्ध सी. पी. साहेबांकडे तक्रार करणार असल्याची धमकी दिली. त्यावेळी आरोपी कविता दोडकेने पोलिसांचा गणवेश आणि ओळखचिन्ह परिधान करुन मी मुंबई पोलीस दलात नेमणुकीस असल्याची बतवणी करुन तोतयागिरी केली. तसेच फिर्यादी हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. बी. जाधव (PSI R.B. Jadhav) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Bogus Lady Police Arrested by MIDC Bhosari Police Station Pimpri Chinchwad Pune Crime News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा