Pune Crime | बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर 2 गंभीर जखमी

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भरधाव वेगात जाणाऱ्या बोलेरो गाडीची (Bolero car) धडक एका दुचाकीला बसली. या भीषण अपघातात (terrible acciden) एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड तालुक्यातील (Daund taluka) खोर येथील खोपाडा-राजुरीपाटी जवळ रविवारी (दि.7) रात्री साडे आठच्या सुमारास झाला. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात (Yavat police station) बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

संभाजी अंबर शिंदे Sambhaji Amber Shinde (वय-20 रा. देऊळगाववाडा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर माणिकराव माने Manikrao Mane (वय-22 रा. खोर, ता. दौंड) व दुचाकी चालक सतीश गुलाब ठोंबरे Satish Gulab Thombre(वय-26 रा. रिसे-पिसे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी बोलेरो गाडीचा चालक राजेंद्र डोंबे Rajendra Dombe याच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

Viral News | पतीला ‘कुत्रा’ बनवून रेल्वे स्टेशनवर घेऊन गेली महिला, गळ्यात साखळी बांधून फिरवले; जाणून घ्या प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो गाडी ही खोरच्या (Khor) दिशेने भरधाव वेगात येत होती. त्याचवेळी दुचाकीवरून तिघेजण भांडगावच्या दिशेने निघाले होते. राजुरीपाटीच्या पुढे खोपड्या नजीक भरधाव बोलेरोची धडक दुचाकीला बसली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकीस्वार संभाजी शिंदे याचा जागीच मृत्यू झाला. तर माणिकराव माने आणि सतीश ठोंबरे हे उडून रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

गावातील नागिरांनी तिघांना तातडीने भांडगाव (Bhandgaon) येथील रुग्णालयात नेले.
मात्र, हॉस्पिटलने त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याने त्यांना यवत येथील सरकारी रुग्णालयात (Government Hospital) नेण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन जखमींना पुढील उपचारासाठी लोणी काळभोर (Lonikalabhor) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, अपघातानंतर मद्यपी बोलेरो चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला.
मात्र, पिंपळाचीवाडी येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे गाडी पकडण्यात नागरिकांना यश आले.
याप्रकरणी यवत पोलिसांनी बोलेरो चालक राजेंद्र डोंबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश कर्चे (Police constables Ganesh Karche) व रमेश कदम (Ramesh Kadam) करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे महापालिकेची ‘टॉयलेट’ कथा ! ‘मलिदा’ घेऊन बिल्डरच्या फायद्यासाठी 20 लाख रुपये खर्चून उभारलेले ‘स्वछतागृह’ मध्यरात्री ‘जमीनदोस्त’

ST Workers Agitation | ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे मैदानात उतरणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | bolero and two wheeler crash daund one died spot and two were seriously injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update