Pune Crime | डोक्यात फोडली बिअरची बाटली; चौघांविरोधात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ‘इथे दारू पिऊ नका’ असं एका महिलेने सांगितल्याने महिलेबरोबर असलेल्या तरुणाच्या (Pune Crime) डोक्यात चौघा दारुड्यांनी बिअरची बाटली फोडली आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील महालेनगर परिसरात घडला. बिअरची बाटली फोडल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) चौघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत माहिती अशी, याप्रकरणी सिद्धार्थ लक्ष्मण कट्टीमणी (Siddharth Laxman Kattimani) (वय 29, रा. सीता सदन, गोखलेनगर रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली. यावरुन सौरभ संजय डोंगरे (Saurabh Sanjay Dongre), अमित देवकर (Amit Deokar), रोहित देवकर (Rohit Deokar) आणि पवार (Pawar) (हे सर्व रा. महालेनगर, वडारवाडी) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादी व त्यांची मावशी हे महालेनगर येथे त्यांच्या भाडेकरूकडे भाडे मागण्यासाठी रविवारी रात्री 8.30 च्या दरम्यान गेले होते. तेथे मोकळ्या जागेत फिर्यादीच्या ओळखीचे चौघेजण दारू पीत बसले होते. (Pune Crime)

दरम्यान, त्यावेळी फिर्यादीच्या मावशीने त्या चौघांना इथे दारू पिऊ नका. भाडेकरू कसे येणार जाणार असे म्हणाल्या. यावरून त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मावशीला शिवीगाळ केली. रोहित देवकर याने फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उकिर्डे (API Ukirde) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | bottle liquor smashed head stopped drinking alcohol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे स्टेशन परिसरातून 15 लाख 67 हजारांचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

JanDhan Account | जनधन खातेधारकांसाठी खुशखबर ! आता बॅलन्स नसताना घेऊ शकता 10 हजार रुपयांचा फायदा, जाणून घ्या

 

Multibagger Stock | 152 रुपयांचा स्टॉक झाला 1,524 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 900% रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळणार भेट ! सॅलरीत जमा होणार ‘हा’ अलाऊन्स, लवकर पूर्ण करा हे काम

 

Mumbai High Court | शारीरीक संबंधानंतर विवाहाला नकार देणे फसवणूक नाही; मुंबई उच्च न्यायालयाने तरूणाची केली सुटका

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा CM उद्धव ठाकरेंना सल्ला; म्हणाले – ‘…मग मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे द्यावा’