सोनसाखळी हिसकाविणारा सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पादचारी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोनसाखळी हिसकाविणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगलीतून अटक केली. मोहम्मद शहाबुद्दीन इराणी (वय २९, रा. सांगली) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ६ फेब्रुवारी रोजी हडपसरमधील गोंधळेनगरमध्ये चालत जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या सराईत इराणीने महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांची साखळी हिसका मारुन चोरुन नेला. त्यानुसार गुन्ह्यातील आरोपी सांगलीत राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सांगलीत जाउन इराणीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, शंकर पाटील, सुनील पवार, रमेश राठोड, विशाल शिर्के, सुरेंद्र साबळे, शीतल शिंदे यांच्या पथकाने केली.

You might also like