Pune : गेल्या 19 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणार्‍याच्या गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – गेल्या 19 वर्षांपासून पुणे पोलीसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यात तो फरार होता. सतीश दशरथ हळदणकर (वय 35, रा. वानवडी) असे 19 वर्षानंतर पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. प्रफुल्ल गायकवाड (वय 25) व त्यांच्यासोबत इतर काही व्यक्तींना सतीश याने सहारा एअरपोर्ट येथे क्लार्क म्हणून नोकरी लावण्याचे आमीष दाखविले होते. तसेच त्याच्याकडून 1 लाख 53 हजार रुपये घेतले होते. त्यांना निवड झाल्याचे बनावट नियुक्तीपत्र देखील दिले. मात्र फिर्यादी यांना याची माहिती घेतल्यानंतर हे पत्र बनावट असल्याचे लक्षात आले.

याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी सतीश हा पसार झाला होता. गेल्या 19 वर्षांपासून तो पोलिसांना सापडत नव्हता. दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून पाहिजे आरोपी व सराईतांची माहिती घेतली जात होती. यावेळी कर्मचारी महेश निंबाळकर यांना आरोपी सतीश हा राहत्या घरी आई आजारी असल्याने येणार असल्याचे समजले. याची माहिती काढण्यात आली. त्यात तो येणार असल्याचे स्पष्ट होताच सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महेश निंबाळकर व त्यांचंच कण.