गेल्या एक वर्षांपासून फरार असणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या एक वर्षांपासून दाखल गुन्ह्यात पोलिसांना गुंगारा देणार्‍यास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याने आरटीओने स्क्रॅप केलेला रिक्षा विकली होती.
राजु शंकर सोनावणे (वय 52, रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनावणे याच्यावर 2018 मध्ये आरटीओने स्क्रॅप केलेला रिक्षा पुन्हा विक्री करून फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. तो पसार झाला होता. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. परंतु, तो पोलिसांना सापडत नव्हता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. तसेच, पाहिजे आरोपी आणि सराईत गुन्हेगारांची माहिती काढली जात होती.

यादरम्यान, युनिट एकमधील पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असणार्‍या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी राजु सोनावणे हा राहत्या घरी आला आहे. त्यानुसार, पोलीस कर्मचारी अमोल पवार, अजय थोरात, वैभव स्वामी, बाबा चव्हाण, सुभाष पिंगळे व त्यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून अटक केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/