पुणे : पिस्तूल अन् 3 जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हे शाखेच्या ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 1 पिस्तुल व 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्यावर यापूर्वी बारा गुन्हे दाखल आहेत.

उमेश रमेश कोकाटे (वय ३४, रा.पोकळे वस्ती, बिबवेवाडी) असे अटक केल्याचे नाव आहे. याबाबत कोकाटे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी शहरातील विविध पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, वाहन चोरी, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न व आर्म्स ऍक्ट नुसार पुणे शहरामध्ये एकूण १२ गुन्हे दाखल आहेत.

सराईत गुन्हेगार व पाहिजे आरोपींची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान युनिट एकचे उप निरीक्षक उत्तम बुदगुडे, सहायक फौजदार वसावे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस नाईक इम्रान शेख, पोलीस शिपाई गजानन सोनुने, पोलीस नाईक सुधीर माने व पोलीस शिपाई तुषार माळवदकर असे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस नाईक सचिन जाधव व पोलीस नाईक इम्रान शेख यांना बातमीदारा मार्फत पोलीस रेकॉर्ड उमेश कोकाटेकडे पिस्तुल असून तो बिबवेवाडी भागात आला आहे. त्यानुसार बकुळ हॉल समोर सापळा रचून अटक केली. त्याच्याताब्यातुन एक गावठी देशी बनावटीचे पिस्तूल व ०४ जिवंत राऊंड असा ५० हजार ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

Visit : Policenama.com