Pune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-2 ची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्याने पायी जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या तयारी असलेल्या टोळीतील चार जणांना गुन्हे Pune Crime Branch शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

युवराज नामदेव गायकवाड (वय ३१, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) बजरंग बलभीम गायकवाड (वय ४५) संतोष छोटू जाधव (वय ३७, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि प्रभू बाबुराव जाधव (वय ५४, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) अशी अटक Arrest केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून छोटी तलवार, कटर, मिरची पुड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांचा एक साथीदार पळून गेला.

Gold Rate Today | खुशखबर ! सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; सोने 2152 आणि चांदी 4647 रूपयांनी ‘स्वस्त’

गुन्हे शाखेच्या युनिट २ चे अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस Police अंमलदार मोहसीन शेख व उत्तम तारु यांना माहिती मिळाली की शंकरशेठ रोडवरील एस टी अधिकारी वसाहत शेजारील रोडच्या कडेला काही जण अंधारात लपून बसले असून ते जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी खात्री करुन तेथे जाऊन अचानक छापा घातला.
तेथून ४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी एक बलभीम गायकवाड हा पळून गेला.
त्यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस Swargate Police ठाण्यात गुन्हा Crime दाखल केला आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे,
सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक निरीक्षक प्रकाश मोरे, वैशाली भोसले,
सहायक फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस अंमलदार, मोसिन शेख, उत्तम तारू,
संजय जाधव, अस्लम पठाण, नामदेव रेणुसे, किशोर वग्गु, चंद्रकांत महाजन,
चेतन गोरे, निखिल जाधव, समीर पटेल, गजानन सोनवणे, गोपाळ मदने, अरुण शिंदे यांनी केली
आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : pune crime branch arrest criminals

हे देखील वाचा

Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, वाढणार नाही प्रॉपर्टी टॅक्स

PM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार घरबसल्या देत आहे 2 लाख रुपये; केवळ 30 जूनपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम