Pune : घरफोडया आणि वाहने चोरणार्‍या दोघा सराईतांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 गुन्हयांची उकल तर 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  घरफोड्या व वाहने चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगाराना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 गुन्हे उघडकीस आणत साडे आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 24) व नागेश मनोहर वाकडे (वय 20) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
शहरात घरफोड्या व वाहन चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक हडपसर परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना दोघेजण दुचाकी व संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील दुचाकीची चौकशी केली. त्यांनी भारती विद्यापीठ येथून दुचाकी चोरली असल्याचे सांगितले. तर दोन साथीदारांच्या मदतीने वानवडीत जबरी चोरी केल्याचेही सांगितले. त्यानुसार त्यांना अटक केली.

त्यांच्याकडे सखोल तपास लेला असता त्यांनी आतापर्यंत 12 गुन्हे उघडकीस आले. 5 चार चाकी, 3 दुचाकी आणि जबरी चोरीचे मुद्देमाल असा एकूण 8 लाख 46 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अजिनाथ गायकवाड हा पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तसेच नागेश काकडे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, उपनिरीक्षक गुंगा जगताप, कांबळे, रामाने, अभंगे, लोखंडे, खान, काळभोर, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव व अमोल सरतापे यांच्या पथकाने केली आहे.