पिस्तूल विक्रीसाठी आलेला सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर रित्या पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि जिंवत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

धिरजकुमार विनोद सिंह (वय 21, रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वाढत्या स्ट्रीट क्राईमला लगाम घालण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीसांना गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, सराईतांची माहिती काढून त्यांना कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी एकनाथ कंधारे व प्रदिप शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एकजन बिहारमधून पिस्तूल विक्री करण्यासाठी पुण्यात आला आहे. त्यानुसार, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मारोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ट निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निलेश महाडीक, सहायक फौजदार एकनाथ कंधारे, प्रदिप शिंदे, पडवळ, पवार यांच्या पथकाने आरोपीची माहिती काढली. त्यावेळी तो बंडगार्डन परिसरात येणार असल्याचे मसजले. त्यानुसार, पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे 2 पिस्तूल मिळून आले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याने हे पिस्तूल कोणाला विक्री करण्यासाठी आणले होते, याची माहिती घेतली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –