Pune Crime News | पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला गुन्हे शाखेकडून अटक; आज दुपारी कोर्टात हजर करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Builder Amit Lunkad Arrest |पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखे (Crime Branch of Pune Police) च्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात संजय होनराव (वय 48) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार लुंकड रियालिटी फर्मचे अमित लुंकड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. pune crime branch arrests builder amit lunkad in cheating case of 21 lacs, today he will produce in shivajinagar court

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुंकड यांच्या फर्मचे कल्याणीनगर (Kalyani Nagar) भागात ऑफिस आहे. फिर्यादी हे अमित लुंकड यांना भेटले असता त्यांनी गुंतवणूक केल्यास 15 टक्के परतावा देऊ असे आमिष दाखविले. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे लुंकड रिऍलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन (Lunkad Reality Building Construction) या फर्ममध्ये वेळोवेळी एकूण 21 लाख 26 हजार 875 रुपये भरले.

मात्र त्यानंतरही त्यांना कसलाच परतावा मिळाला नाही. तर त्यानी गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत न करता फसवणूक (Fraud)  केली आहे. फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्याची प्राथमिक चौकशी करत आज गुन्हा (Crime) दाखल करून गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Senior Police Inspector Balaji Pandhare) आणि त्यांच्या पथकाने तात्काळ अमित लुंकड (Builder Amit Lunkad)याला अटक (Arrest)केली आहे. लुंकडला आज दुपारी न्यायालया (shivajinagar court) त हजर केले जाणार आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : pune crime branch arrests builder amit lunkad in cheating case of 21 lacs, today he will produce in shivajinagar court

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Pune Crime News | 11 नागरिकांची तब्बल 3 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक; बापलेकांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमेवरून केले अटक