Pune : जबरी चोर्‍या आणि घरफोडया करणार्‍यास गुन्हे शाखेकडून अटक, 4 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जबरी चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या फरार गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 4 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

जयपालसिंग उर्फ मोन्यासिंग राजपालसिंग टाक (वय 20, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी त्याचा साथीदार अमरसिंग टाक याला अटक केली होती. त्याच्याकडून काही गुन्हे उघडकीस आणत 6 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला होता.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कार चालकाला ढकलून देत त्याची कार पळवली होती. याप्रकरणी तपास सुरू असताना या दोघांनी हा गुन्हा केला असल्याचे समोर आले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अमरसिंग याला पकडले होते.यावेळी जयपालसिंग व त्याने हे गुन्हे केले असल्याचे सांगितले. मात्र ज्यपालसिंग हा फरार झाला होता. त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडून 8 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तर 4 लाख 1 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दोन्ही आरोपीकडून पोलिसांनी एकूण 10 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर आयुक्त अशोक मोराळे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, नितीन मुंढे, मच्छिन्द्र वाळके, ऋषीकेस टिळेकर, राहुल माने, प्रतीक लाहीगुडे, शेखर काटे, नितीन घाडगे आणि देशमुख यांच्या पथकाने केली आहे.