Pune : घरफोडया अन् वाहन चोर्‍या करणार्‍या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक, 6 गुन्हयांची उकल तर 10 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात पार्किंग केलेल्या वाहने चोरून त्याद्वारे घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 6 गुन्ह्यांची उकल करत 10 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रामजितसिंग रणजितसिंग टाक (वय 18, रा. रामटेकडी, हडपसर) व अमरसिंग जगरसिंग टाक (वय 21, रा. रामटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
शहरात घरफोड्याचे सत्र कायम असून, त्याअनुषंगाने या चोरट्यांचा माग काढण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. यादरम्यान गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या एका गुन्ह्याचा तपास करत होते. यावेळी पोलिसांना हा गुन्हा सराईत गुन्हेगार टाक यांनी केला आहे. त्यानुसार त्यांची माहिती घेण्यात आली. यानुसार या दोघांना सापळा रचून पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी यांच्यासह गुन्हे केले असल्याचे सांगितले. सखोल तपासात त्यांच्याकडून वाहन चोरी व घरफोडीचे एकूण 6 गुन्हे केले. त्यांच्याकडून एक अपाची, टाटा नेक्सोन कार, एक ऍक्टिवा मोपेड, घरफोडीचे साहित्य असा 10 लाख 6 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोघेही रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहाय्यक निरीक्षक भालचंद्र ढवळे, उपनिरीक्षक किरण अडागळे, कर्मचारी संतोष क्षिरसागर, दीपक मते, अनिल शिंदे, अतुल साठे, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, नितीन रावळ, संदीप तळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.