Pune : घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन चोरी करणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक, 8.5 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   घरफोडी, जबरीचोरी आणि वाहनचोरीतील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 8 दुचाकी जप्त करून 8 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. आरोपींवर जबरीचोरी, घरफोडी, वाहनचोरी असे एकूण 12 गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आल्याचे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

अजितनाथ लक्ष्मण जगताप (वय 24, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) आणि नागेश मनोहर वाकडे (वय 20, रा. वाडकर चाळ, महंमदवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक हडपसरमध्ये गस्तीवर होते. त्यावेळी बिगर क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे उघडकीस आले. होंडा युनिकॉर्न, चांदीची रिंग, अल्टो कार, हुंदाई वेरणा, बोलेरो पिकअप जीप, सेव्हरलेट कार, इंडिका, प्लेझर मोटारसायकल, सुझुकी जिक्सर मोटारसायकल अशा एकूण 5 चारचाकी व 3 दुचाकी अशी एकूण 8 वाहने जप्त करून जबरी चोरीतील आठ लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अजिनाथ गायकवाड याच्याविरुद्ध जबरीचोरी, घरफोडी, वाहनचोरी असे 15 गंभीर गुन्हे दाखल असून, नागेश वाकडे याच्यावर 3 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास गाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक बुवा कांबळे, पोलीस हवालदार विनायक रामाने, राजेश अभंगे, राजेश लोखंडे, शाकीर खान, उदय काळभोर, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, अमोल सरतापे, गणेश लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.