Pune : रेकी करून बंद फ्लॅट फोडणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, 9 लाखाचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात बंद फ्लॅटची पाहणीकरून ते फोडणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणत साडे नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याचे साथीदार मात्र पसार असून, पकडलेला चोरट्यावर 100 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.

रमेश महादेव कुंभार (वय 43, रा. काल्हेर, त. भिवंडी, जि. ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरात घरफोड्या वाढल्या आहेत. यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या आहेत. तर सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. यादरम्यान सहकारनगर परिसरात 2016 साली झालेल्या घरफोडीतला आरोपी रमेश हा त्याच्या राहत्या घराच्या परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली होती. त्यानुसार त्याची माहिती काढली आणि त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे या घरफोडी बाबत चौकशी केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला अटक करत त्याच्याकडे सखोल तपास करत आणखी 4 गुन्हे केल्याचे सांगितले. त्याने साथीदारांच्या मदतीने शहरात घरे फोडली असल्याचे सांगितले. त्याच्याकडून या गुन्ह्यातील 9 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आता त्याच्या साथीदारांची माहिती काढली जात असून, त्यांना अटक केल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, यशवंत आंब्रे, अजित फरांदे, कादिर शेख, समीर पटेल, उत्तम तारु, मितेश चोरमले, निखिल जाधव यांच्या पथकाने केली आहे.