Pune : लोणीकंद परिसरातून जबरी चोरी करून पसार झालेल्यांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, 7.25 लाखाचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोणीकंद Lonikand परिसरातील हम रस्त्यावर जबरी चोरीकरून पसार झालेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

भाजपच्या खासदाराचा घरचा आहेर, म्हणाले – ‘मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला’

इशाप्पा उर्फ विशाल जगनाथ पंदी (वय 19), प्रदिल उर्फ बाबू यशवंत कोंढाळकर (वय 23), ओंकार शंकर गुंजाळ (वय 24), गणेश रामदास काळे (वय 32), विजय नंदू राठोड (वय 22) अशी अटक केलेल्या टोळीचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद Lonikand पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

यातील फिर्यादी हे येथील हम रस्त्यावरून जात असताना त्यांना अडवून मारहाण करत साडे तेरा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करत होती. यावेळी युनिट सहाच्या पथकाला हा गुन्हा सराईत गुन्हेगार इशाप्पा याने गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला केसनंद फाटा परिसरात सापळा रचून अटक केली. त्यानंतर प्रदीप याला पकडले. त्यांना या गुन्ह्यात अटक करून त्याची माहिती घेतली असता हा गुन्हा इतर तीन साथीदार यांच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. त्यानुसार या तिघांना सापळा रचून अटक केली. यावेळी त्यांच्याकडून सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यातील इशप्पा व ओंकार गुंजाळ हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक निरीक्षक पाटील, कर्मचारी तऋषीकेस ताकवणे, ऋषीकेस व्यवहारे, ऋषीकेस टिळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत