Pune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पथकांनी सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

संजय उर्फ सोन्या हरिष भोसले (वय 21,रा. हंडेवाडी) व पुरुषोत्तम उर्फ बंड्या राजेंद्र वीर (वय 25, रा. नादेडफटा) अशी अटक (arrest) केलेल्या दोघांची नावे आहेत.

शहरात लुटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
तर दुसरीकडे पाहिजे आरोपी आणि सराईत गुन्हेगार बिंदास फिरत आहेत.
त्यामुळे पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) पथकांना या घटना रोखण्यासोबत सराईतांची माहिती काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यादरम्यान गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलीस नाईक चेतन मोरे (Police Naik Chetan More) यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हडपसर येथे घडलेल्या जबरी चोरी प्रकरणातील आरोपी हे ससाणेनगर येथे येणार आहेत.
त्यानुसार पथकाने येथे सापळा लावून त्यांना पकडले.
तर त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली.
त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर त्यांनी हडपसर, सिंहगड रोड व सहकारनगर परिसरातील चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
त्यांच्याकडून दुचाकी व इतर असा 1 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई (Action) पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Police Inspector Mahendra Jagtap), सहाय्यक निरीक्षक प्रकाश मोरे (Assistant Inspector Prakash More), वैशाली भोसले (Vaishali Bhosle) व त्यांच्या पथकाने केली आहे.

Wab Title :- Pune Crime Branch arrests two burglars

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

Pune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा एक्सप्रेस’ मधून फेकलं, एकचा जागीच मृत्यू

धक्कादायक ! प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा