पुणे : Pune Crime Branch News | कोलवडी गावातील मुळा मुठा नदी पात्रात वाळु उपसा करणार्या रेकॉर्डवरील आरोपीवर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने कारवाई केली. त्याचवेळी ३५ लाख ४० हजार रुपयांचा पोकलँड, २ ट्रॉलीसह ट्रॅक्टर, ८ ब्रास वाळु असा माल जप्त करण्यात आला आहे.
पंकज सदाशिव गायकवाड (वय ३८, रा. भैरोबा वस्ती, कोलवडी, ता. हवेली) असे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. पंकज गायकवाड याच्याविरुद्ध कोंढवा व पौड पोलीस ठाण्यात खुन, हडपसरमध्ये जबरी चोरी, दरोड्याची तयारी, बेकायदा जमाव जमवून दंगल माजविणे, असे ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला २ वर्षे तडीपारही करण्यात आले होते.
गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस पथक थेऊर ते कोलवडी गावातील मुळा मुठा नदी पात्रामध्ये गस्त करुन अवैधरित्या वाळु उपसा करणार्यांचा शोध घेत असताना कोलवडी येथील शितोळे वस्ती येथे ट्रॅक्टर व पोकलँड दिसून आले. पोलिसांनी पंकज गायकवाड व त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेऊन नदी पात्रातील अवैधरित्या वाळु उपसा करणार्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर व यंत्रसामुग्री जप्त केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.