पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime Branch News | मुंबईतील व्ही पी रोड पोलीस ठाण्याच्या (VP Road Police Station) हद्दीत त्यांनी २०२२ मध्ये दरोडा घातला (Robbery Case). त्यानंतर तो गेली दोन वर्षे पुण्यात लपून बसला होता. मात्र, भितीमुळे त्याने स्वसंरक्षणासाठी पिस्टल बाळगले होते़ त्याची खबर मिळाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला.
साहिल राजू शेख Sahil Raju Shaikh (वय २४, रा. मॅजेस्टिक पार्क, वडाची वाडी रोड, उंड्री) असे त्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाया तसेच बेकायदेशीर हत्यार, अग्निशस्त्रे वापरणारे यांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्या अनुशंगाने गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडील पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले यांना बातमी मिळाली की, एक जण बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगत आहे. या बातमीची शहानिशा करण्याकामी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथकाने कोंढव्यातील कौसरबाग येथून साहिल शेख याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये त्याच्याकडे देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. काळे पडळ पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक चौकशीत मुंबईतील व्ही पी रोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २०२२ मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल असून तेव्हापासून दोन वर्षे तो फरार आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.