Pune Crime Branch News | बोलेरो पिकअपमधून होत होती गावठी दारुची वाहतूक ! दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने पकडली 4 लाख 12 हजारांची दारु

Pune Crime Branch News | The transportation of gavthi alcohol was done by Bolero pick-up! Anti-Robbery and Vehicle Theft Squad seized liquor worth 4 lakh 12 thousand
ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime Branch News | कोंढवा-कात्रज रोडवर (Katraj Kondhwa Road) बोलेरो पिकअप वाहनातून गावठी दारुची वाहतूक होत असल्याचे आढळून आले आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने ही पिकअप व्हॅन पकडली असून त्यातील ४ लाख १२ हजार रुपयांची गावठी दारु जप्त केली आहे. भगत गणेश प्रजापती Bhagat Ganesh Prajapati (वय २४, रा. बगळे मळा, उरळी कांचन) याला अटक करण्यात आली आहे.(Pune Crime Branch News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संदिपान पवार (PI Sandipan Pawar) यांचे पथक गुन्हे प्रतिबंध गस्त करीत होते. कात्रज – कोंढवा रोड बायपासने ते जात असताना पोलीस अंमलदार विनय येवले यांना एका बोलेरो पिकअप गाडी संशयितरित्या जाताना दिसली. त्यांनी गाडी थांबून आतील बाजूला चेक केले तर त्यात १ लाख ५७ हजार ५०० रुपयांची ४५ प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी ३५ लिटर अशी एकूण १५७५ लिटर गावठी हातभट्टी तयार दारु मिळून आली.

पोलिसांनी या दारुसह मोबाईल, बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख १२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व दरोडा व वाहन चोरी पथकातील पोलीस निरीक्षक संदिपान पवार,
तसेच सहायक पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस अंमलदार विनय येवले यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Keshav Upadhye On Congress-Rahul Gandhi | भाजपचे राहुल गांधींना आव्हान ! छत्रपतींचा अपमान करणाऱ्या नेहरूंच्या वक्तव्याचे प्रायश्चित्त घ्या – केशव उपाध्ये

Pune Pimpri Chinchwad Crime News | गुन्ह्याचा पंचनामा करणार्‍या पंचावरच दाखल झाला गुन्हा; काय आहे नेमके प्रकरण, वाचा सविस्तर

Total
0
Shares
Related Posts