Pune : कुत्र्यांची पिल्ले विकून त्यानं जमवले पैसे, हौसेपोटी घेतलं पिस्तूल अन् पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हौसेला मोल नसते असे म्हटले जाते, ते काय उगाच नाही. कारण, पुण्यात एका तरुणाने पिस्तुल घेऊन फिरण्याच्या हौसेसाठी प्रथम “कुत्र्यांची पिल्ले” विक्री करण्याचा व्यवसाय केला अन त्यातून मिलेल्या पैश्यातून पिस्तुल घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे पोलीस मात्र बेचैन झाले असून, तरुणाई वळत असलेल्या मार्ग धोकादायक असल्याचे म्हणत आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट एकने या तरुणाला सापळा रचून अटक केली.

कुणाल दयानंद पाटोळे (वय 19, तळजाई पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान युनिट एकचे पथक माहिती काढत असताना कर्मचारी अमोल पवार यांना बतमीदारामार्फत की अखिल तळजाई पठार मित्र मंडळाच्या मंदिरासमोर एकजण उभा असून, त्याच्या कंबरेला पिस्तुल आहे. तो काही गुन्हा करण्याच्या तयारीत आहे.

त्यावेळी वरिष्ठ निरीक्षक ताकवले, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, कर्मचारी अमोल पवार, अजय थोरात, वैभव स्वामी, तुषार माळवदकर, बाबा चव्हाण, सुभाष पिंगळे यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याकब्याजवल पिस्तुल व दोन काडतुसे मिळून आले. पिस्तुल का बाळगत आहे, असे विचारल्यानंतर त्याने आपल्याकडे ही पिस्तुल असावे आणि ते घेऊन आपण फिरावे असे वाटत असल्याने घेतल्याचे सांगितले. तसेच, हे पिस्तुल घेण्यासाठी त्याने कुत्र्यांची पिल्ले विक्रीचा व्यवसाय केला अनंत यातून मिळालेल्या पैश्यातून घेतले असल्याचे सांगितले. त्याने पिस्तुल कुठून आणले याबाबत माहिती घेतली जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like