Pune Crime Branch Police | जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या कारणावरुन तरुणाचा सपासप वार करुन खून, 12 तासात 4 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  जुन्या भांडणाच्या व उसने पैशाच्या कारणावरुन एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची घटना मांजरी खुर्द (Manjari Khurd) येथील स्मशानभूमीजवळ रविवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. याप्रकरणी पुणे गुन्हे शाखा पोलिसांच्या (Pune Crime Branch Police) युनिट-6 च्या पथकाने चौघांना लोणीकंद (lonikand) येथील खंडोबा माळ येथून अटक (Arrest) केली आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) पथकाने 12 तासात आत आरोपींना अटक केली.

विकास लक्ष्मण सोनवणे (वय-31 रा. मांजरी खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तर शुभम अशोक गायकवाड (वय-23), अभिजित उर्फ नाना सुखराज महाले (वय-23), हेमंत किसन मोरे (वय-31), गोविंद बाबासाहेब बनसोडे (वय-26 सर्व रा. शिवशंभोनगर, संतोषी माता मंदिराजवळ, मांजरी खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट-6 चे पथक हद्दीत गस्त घालत असताना मांजरी खुर्द येथील स्मशानभूमीजवळ एकाचा खून झाला असल्याची माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी आरोपी केसनंद गावाच्या दिशेने वेरणा कारमधून (Verna car) पळून गेल्याची माहिती मिळाली. आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेची दोन पथके लोणीकंद आणि केसनंदच्या दिशेने रवाना करण्यात आली. आरोपींचा पाठलाग करुन एका लोणीकंदच्या दिशेने गेलेल्या पथकाने आरोपी गाडी उभी करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतले.

 

 

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता.
जुन्या भांडणातून आणि उसने घेतलेल्या पैशातून विकास सोनवणे याचा कोयत्याने
वार करुन तसेच दगडाने ठेचून मारहाण करुन खून केल्याची कबुली दिली.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून बारा तासाच्या आत आरोपींना अटक केली.
याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Commissioner of Police Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint Commissioner of Police Dr. Ravindra Shiswe), अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale), पोलीस उपायुक्त श्रीनीवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (Assistant Commissioner of Police Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे,
प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर,
शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, तांत्रिक विश्लेषण विभागाचे सलीम तांबोळी यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime Branch Police | 4 arrested in 12 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Digital Currency | भारतात डिजिटल करन्सी आणण्याची तयारी करतेय RBI, जाणून घ्या नोटांपेक्षा किती असेल वेगळी, काय होणार सामान्य लोकांना फायदा

Viral Video | अंडरविअरवर मासे पकडण्यासाठी गेला तरूण, खेकडयाने डायरेक्ट धरला प्रायव्हेट पार्ट; पुढं झालं असं काही….(व्हिडीओ)

Praniti Shinde | आमदार प्रणिती यांच्या मंत्रिपदासाठी सुशीलकुमार शिंदेंनी आमदाराला पाडले; ‘या’ माजी मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट