Pune Crime Branch Police | तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणारा सराईत आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन केक कापणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Crime Branch Police) पथकाने अटक (Arrest) केली आहे. आरोपीने तलवारीने केक कापून त्याचे फोटो फेसबुकवर (Facebook) टाकले होते. पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून तलवार जप्त (sword Seize) केली.

अजिंक्य भगवान राजगुरु (वय-27 रा. घर नं. 22, आझाद आळी, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे आरोप आहे. आरोपी अजिंक्य राजगुरू याने सार्वजनिक ठिकाणी (public places) तलवारीने केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार इम्रान शेख (Imran Sheikh) व तुषार माळवदकर (Tushar Malwadkar) यांना मिळाली. तो तलवार हातात घेऊन येरवडा गावठाण (Yerawada Gaothan) परिसरात फिरत असल्याचे समजले.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन हजार रुपये किंमतीची दुधारी पाते व नक्षीदार मुठ असलेली तलवार जप्त केली. आरोपी अजिंक्य राजगुरू याच्या विरोधात येरवडा पोलीस स्टेशन (Yerawada Police Station), कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) बेकायदेशीर जमाव जमवून दंगा, मारामारी, दुखापत केल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (Additional Commissioner of Police
Ashok Morale), पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of
Police Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त सुरेंन्द्रनाथ देशमुख (Assistant
Commissioner of Police Surendra Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा
युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh
Sankhe), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अमंतलदार सतिश
भालेकर, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, महेश बामगुडे, अय्याज दडडीकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा

PF Account | पीएफचे पैसे काढायचे असतील तर लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा अडकतील सर्व पैसे !

Voltro Motors | केवळ 4 रुपयात करा 100 कि.मी.चा प्रवास, जाणून घ्या Voltro इलेक्ट्रिक सायकलबाबत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime Branch Police | Accused arrested, who was celebrating his birthday by cutting a cake with a sword

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update