Pune Crime Branch Police | पुण्यातील बड्या व्यावसायिकाकडून 50 लाखाची खंडणी घेताना दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, औंध परिसरात थरार

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  एका बड्या व्यवसायिकाकडे 50 लाखांची खंडणी मागत ती स्विकारत असताना दोघांना पुण्याच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथकाने (anti extortion cell pune) रंगेहात पकडले आहे. औंध परिसरात (Aundh Area) खंडणी घेतानाचा हा थरार घडला आहे. भरदुपारी हा थरार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पथकाने त्यांना पाठलागकरून पकडले आहे. पकडलेल्या दोघांपैकी एकजण हा पूर्वी या व्यवसायिकाकडे चालक म्हणून नोकरी करत असल्याचे समोर आले होते. anti extortion cell of crime branch pune arrests two for extorting Rs 50 lakh from Pune businessman

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अजुहरद्दीन शेख (वय 24, रा. पिंपरी चिंचवड, मूळ, पश्चिम बंगाल) आणि संतोष सुरेश देवकर (वय 32, रा. शाहूनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांची कंपनी असून, त्यांचा कन्स्ट्रक्शनचाही व्यवसाय आहे.
दरम्यान त्यांना गेल्या आठवड्यात एका (दि 16 जून) अनोळखी क्रमांकावरून फोन आला.
त्याने थेट “पचास लाख रुपये दे नही तो ठोक दुगा, कल तक पैसे रेड्डी रखने का, मै जो बोल रहा हु वही सुनने का, पैसे का इंतजाम रखनेका, पोलीस को पता चला तो अंजाम जानता है.
तेरा खानदान तो पुरा गया, अशी धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
याबाबत तक्रारदार यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एककडे तक्रार केली होती.
याबाबत पोलिसांकडून तपास सुरू होता. आज पुन्हा आरोपींनी फिर्यादी यांना फोन केला व 50 लाख रुपये घेऊन औंध भागात बोलावले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.
तक्रारदार यांना पैसे घेऊन ज्याठिकाणी बोलावले तेथे पाठविले.
त्यानंतर अजुहरद्दीन शेख हा पैसे घेत असताना त्याला पथकाने छापा टाकून रंगेहात पकडले.

त्याची चौकशी केल्यानंतर त्याला आरोपी संतोष देवकर याने खंडणी मागण्यास सांगितले
असल्याचे समोर आले. मग पोलिसांनी पिंपरी चिंचवड परिसरात शोध घेऊन त्यालाही लागलीच पकडले.
संतोष देवकर यांच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने कर्ज फेडण्यासाठी हा कट रचला असल्याचे समोर आले आहे.
संतोष देवकर हा पूर्वी तक्रारदार यांच्याकडे गाडी चालक म्हणून काम करत होता.
त्यामुळे त्याला पूर्ण माहिती होती.
त्याने 2016 मध्ये त्यांची नोकरी सोडली.
त्याला तक्रारदार यांनी नोकरीवर असताना आर्थिक मदत देखील केली होती.
त्यामुळे त्याला आर्थिक परिस्थिती माहिती होती.
त्याला कर्ज झाल्याने त्याने तक्रारदार यांच्याकडून खंडणी घेण्याचा हा कट रचला होता.
मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (assistant commissioner of police laxman borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (senior police inspector balaji pandhre), उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विनोद साळूखे, शैलेश सुर्वे, प्रदीप शितोळे,
सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रवीण पडवळ, आशा कोळेकर, प्रदीप गाडे, संपत अवचरे,
विजय गुरव, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, अमोल पिलाने, भूषण शेलार,
मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : pune crime branch police | anti extortion cell of crime branch pune arrests two for extorting Rs 50 lakh from Pune businessman

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | निवृत्त पोलिस अधिकार्‍याकडे 91 लाखांच्या खंडणीची मागणी, कोंढव्यातील पापा इनामदार टोळीवर गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक