Pune Crime Branch Police | वाहन आणि मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; दुचाकी चोरीचे 6 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहर आणि परिसरातून वाहन चोरीसह मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch Police) अटक (Arrest) केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने (Anti-robbery and anti-theft squad) ही कारवाई केली असून वाहनचोरीचे 6 गुन्हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 53 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी आणि 18 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई रामटेकडी येथे करण्यात आली.

आकाश दयानंद गायकवाड (वय 22, रा. आबनावे वाडा, उरूळी देवाची, पुणे), प्रशांत मधुकर भोसले (वय- 20 रा.पालखी मार्ग, उरूळी देवाची, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आकाश गायकवाड हा पाच गुन्ह्यातील फरार आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत होते.

दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर (Police Inspector Sunil Pandharkar) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप कर्मचाऱ्यांसोबत वानवडी, हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रामटेकडी परिसरात दुचाकीचोर असल्याची माहिती पोलीस नाईक शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांना मिळाली.

त्यानुसार सापळा रचून दोघांना गाडीसह ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरलेल्या दुचाकींची माहिती दिली.
आरोपींनी हडपसर, कोंढवा, लोणी काळभोर, वानवडी आणि वाकड पोलीस स्टेशनच्या (Wakad Police Station) हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून 18 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि 1 लाख 53 हजार रुपये किंमतीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत.
आकाश गायकवाड याला लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तर प्रशांत भोसले याला कोंढवा पोलीस स्टेशनच्या (Kondhwa Police Station) ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे (Additional commissioner of police Ashok Morale), पोलीस उपायुक्त, गुन्हे श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 लक्ष्मण बोराटे (assistant commissioner of police laxman borate), वाहनचोरी विरोधी पथक 2 पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर (police inspector sunil pandharkar) यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप (Police Sub Inspector Gunga Jagtap), पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे, शाकिर खान, राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने केली.

Web Titel :- Pune Crime Branch Police Arrest criminals and open 6 crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis । नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेनं शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं, अन्…

Maharashtra Police Recruitment | राज्यात डिसेंबर 2021 पर्यंत 5200 पोलिसांची भरती, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची घोषणा (व्हिडिओ)

SSB HC Recruitment 2021 | तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! हेड कॉन्स्टेबलच्या 115 जागांसाठी भरती