पुण्यात गांजाची विक्री करणार्‍या रोहित लंकेला गुन्हे शाखेकडून अटक, दीड लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  विश्रांतवाडी परिसरात गांजाची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 47 हजार रूपये किंमतीचा 7 किलो 260 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

रोहित नानाभाऊ लंके (वय २१, रा. कस्तुरबा हौसिंग सोसायटी, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात वाहन चोरी तसेच घरफोड्या आणि अमली पदार्थ विक्री तेजीत सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी विश्रांतवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी हा दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने विश्रांतवाडी परिसरात गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे 1 लाख 47 हजार रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. आरोपींनी हा गांजा कोठून आणला, ते कोणाला विक्री करत होते, याचा तपास सुरू आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like