मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरी असल्याचे सांगुन पंचतारांकित हॉटेलची फसवणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरी प्रविण परदेशी असे खोटे नाव सांगुन पुण्यातील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलची फसवणुक केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात मुंबईतील एका प्रसिध्द उद्योजकासह 5 जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने मुंबईतील एका प्रसिध्द उद्योजकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दि. 10 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11a15132-ca27-11e8-8401-59fb70eb5d02′]

आदित्य अशोक जोगानी (39, रा. तहानी हाईट्स, नेपीसी रोड, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून तो मुंबईतील प्रसिध्द उद्योजक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी सचिन डिडोळकर (36, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. डिडोळकर हे मंगलदास रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कमर्शियल डायरेक्टर म्हणुन नोकरी करतात.

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरी प्रविण परदेशी असे खोटे नाव सांगुन बतावणी करणार्‍यासह आदित्य जोगानी, मानव शहा, नवीन शहा आणि गीता शहा यांच्याविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात भादंवि 420,170 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नं. 1 म्हणजेच मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरी असल्याची खोटी बतावणी करणार्‍याने जानेवारी 2018 ते आत्‍तापर्यंत पंचतारांकित हॉटेलशी ई-मेलव्दारे संपर्क साधला आणि त्यांचा विश्‍वास संपादन केला.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19b863f9-ca27-11e8-9ad7-53ad22fab3cc’]

आरोपीने हॉटेलच्या रिसेप्शन येथे स्वतः शासकीय अधिकारी नसताना त्याचा गैरफायदा घेवुन फोनव्दारे फिर्यादीशी संपर्क साधला. स्वतःच्या आणि इतरांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय हॉटेलमध्ये करून घेतली. इतर व्हीआयपी सर्व्हिस उपभोगुन हॉटेलचे बील न देता फसवणुक केली. हॉटेलचे जवळपास 95 हजार 900 रूपयांचे बील बुडवुन पंचतारांकित हॉटेलच्या व्यवस्थापनाची फसवणुक केली.

थेट मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरी असल्याची खोटी बतावणी करून फसवणुक झाल्याने प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. प्रकरणाचा संपुर्ण तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्‍त प्रदीप देशपांडे, उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्‍त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, महिला सहाय्यक निरीक्षक व्ही.एस. चव्हाण आणि त्यांच्या पथकाने आरोपी आदित्य जोगानी याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. 10 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22a6017b-ca27-11e8-bab7-a7b7d1322c35′]

आदित्य अशोक जोगानी हा मुंबईतील प्रसिध्द उद्योजक असून त्याने यापुर्वी देखील परदेशी डायमंड कंपन्यांना फसविले असुन त्याच्याविरूध्द यापुर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहाय्यक निरीक्षक व्ही.एस. चव्हाण करीत आहेत.