Pune Crime Branch Police | हातात कोयते घेऊन त्याचा व्हिडीओ बनवून सोशलवर व्हायरल करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  हातात कोयते घेऊन त्याचा व्हिडीओ तयार केल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तिघांना पुण्याच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) पथकाने सापळा रचून अटक केली आहे. तिघे वेगवेगळ्या भागातील आहेत. नितीन सुंदर दहिरे (वय 22, रा. हिंगणे मळा, हडपसर), अनिकेत अशोक कुंदर (वय 22, ससाणेनगर) आणि कुणाल मोहन जाधव (वय 21, रा. वाघोली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद व हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. pune crime branch police arrest three criminals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

शहरात नव्या भाईंनी जास्त गोंधळ घातला आहे. दहशत बसविण्यासाठी हे भाई सोशल मीडियाचा आधार घेतात.
हातात हत्यारे घेऊन दोन चार टोळके घ्यायची व त्याचा एक फेमस गाण्यावर आणि डायलॉग असणारा व्हिडीओ बनवायचा.
हा व्हिडीओ मग आपल्या व्हाट्सअ‍ॅप स्टेट्स, फेसबुकवर आणि सोशल मीडियावर टाकून आपलीच दहशत असल्याचा आव आणतात.
या भाईवर पोलिसांनी नजर ठेवत हातात कोयत्या ऐवजी बेड्या अडकविण्याचे नियोजन आहेत.
या भाईंची माहिती काढली जात आहे. यादरम्यान युनिट सहाच्या पथकाला माहिती मिळाली
की दोघेजण पालघन सारखी हत्यारे घेऊन त्याचा व्हिडीओ काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे दोघे फिरत आहेत.
त्यानुसार पोलिसांनी नितीन दहिरे व कुंदर या दोघांना ताब्यात घेतले.
चौकशी केल्यानंतर त्यांनी फक्त दहशत बसावी यासाठी असले उद्योग करत स्टेट्स ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना अटक करत पोलीस खाक्या दाखविला आहे.
तर जाधव हा देखील दहशत निर्माण होण्यासाठी व्हाट्सअपला असले स्टेट्स ठेवत होता.
त्याची माहिती मिळाली असती त्याच्यावरही गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

दरम्यान तरुणाईने कोणाच्या सांगण्यावरून किंवा मुद्दाम असले स्टेट्स ठेवू नये.
कायदेशीर कारवाई झाल्यानंतर पुढे अडचणी निर्माण होतात.
असे कोणी करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधला,
असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी केले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shreeniwas ghatge), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (assistant commissioner of police laxman borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane), सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, कर्मचारी मच्छिद्र वाळके, कानिफनाथ कोरखोले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतीक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन घाडगे, शेखर काटे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : pune crime branch police arrest three criminals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | तिनं केली प्रेमसंबंधाबाबत विचारपूस, पतीनं आवळला पत्नीचा गळा अन् संपवलं