पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दहशत पसरवण्यासाठी हातात तलावार घेऊन काढलेले फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 (Pune Crime Branch Police) च्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुणे शहरात हातात तलवार, कोयते घेऊन त्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियात (social media) व्हायरल करणाऱ्यांवर पुणे गुन्हे शाखेकडून (Pune Crime Branch Police) कारवाई केली जात आहे.
गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अंमलदार सचिन जाधव (Sachin Jadhav) यांना माहिती मिळाली की, रोहान रमेश घोलप (वय-21 रा. गोखले नगर, पुणे) याने हातात तलवार घेतल्याचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला (WhatsApp status) ठेवला असून तो तलवार (Sword) घेऊन डेक्कन येथील झेड ब्रीजवर (Deccan Z Bridge) थांबवला आहे. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने झेड ब्रीज येथे सापळा रचून रोहनला अटक (Arrest) केली. त्याच्यावर आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
तसेच पोलिस अंमलदार अजय थोरात (Ajay Thorat) यांना मिळालेल्या माहितीनुसार,
रेकॉर्ड वरील गुन्हेगार अखिल ऊर्फ गणेश विलास देशमुख (वय -30 रा. 1343 कसबा, पुणे) याने हातात तलवार घेऊन केक कापतानाचा फोटो वॉट्सॲपवर स्टेटस ठेवले आहे.
तसेच तो तलवार घेऊन सूर्या हॉस्पिटल (Surya Hospital) जवळ येथे थांबला आहे.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.
त्याच्या विरूद्ध फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये आर्म ॲक्ट 4(25) मपोका क 37(1) 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale),
पोलिस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge),
सहायक पोलिस आयुक्त गुन्हे 1 सुरेंद्र देशमुख (Assistant Commissioner of Police Surendra Deshmukh)
यांचा मार्गदर्शनखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड (Police Sub Inspector Sanjay Gaikwad),
सुनिल कुलकर्णी (Police Sub Inspector Sanil Kulkarni),
पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, सचिन जाधव, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, विजयसिंह वसावे, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांनी केली आहे.
Web Title :- Pune Crime Branch Police arrest two criminals
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Social News | या वर्षी साखरप्याची बाजारपेठ पुरात बुडाली नाही ! कोकणातील साखरप्याला गवसला पुरापासून मुक्तीचा मार्ग; जाणून घ्या
Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महारक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद; 1883 ‘युनिट’चे संकलन