Pune Crime Branch Police | घरफोडी करुन गावाकडं थाटला संसार, 7 वर्षांनी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोथरुड (kothrud) परिसरात घरफोडी करुन फरार झालेल्या एका चोरट्याने गावाकडं लग्न करुन संसार थाटला. मात्र, सात वर्षांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना (Pune Crime Branch Police) त्याची माहिती मिळाली अन् तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीच्या सात वर्षांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) युनिट एकने आज (सोमवार) व्हि.आय.टी हॉस्टेल (V.I.T Hostel) चौकात केली.

गणेश भाऊराव कांबळे (वय-31 रा. डॉल्फीन चौक, चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर, पुणे सध्या रा. अण्णा भाऊ साठेनगर, मुपो रोही-भालगाव ता. बार्शी जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2014 मध्ये कोथरुड परिसरातील महेंद्र करडे हे बाहेर गावी गेले होते. त्यावेळी अज्ञात आरोपीने कुलुप तोडून घरातील 66 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून (Stealing gold jewelry) नेले होते. याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) गुन्हा दाखल करण्यात आला  होता. या गुन्ह्यात नितीन लक्ष्मण तांबारे (रा. डहाणूकर कॉलनी, कोथरुड) याला अटक (Arrest) करण्यात आली होती. तर त्याचा साथिदार गणेश कांबळे हा फरार झाला होता.

दरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार अमोल पवार (Amol Pawar) यांना बातमीदारामार्फत गणेश कांबळे हा भावाला भेटण्यासाठी व्हीआयटी हॉस्टेल चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि.9) व्हीआयटी चौकात सापळा रचून रिक्षातून उतरत असतानाच गणेश कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने गुन्हा केल्यानंतर सात वर्षापासून फरार होता.
या कालावधीत त्याने लग्न करुन सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) बार्शी तालुक्यातील रोही भालगाव येथे कुटुंबासह राहत होता.
आरोपी विरोधात भारती विद्यापीठ -2, बिबवेवाडी-1, सहकारनगर 1, कोथरुड 1, लोणी काळभोर 1 व
हवेली पोलीस ठाण्यात 4 असे घरफोडी चोरी, दरोड्याची तयारी व इतर असे एकूण 10 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुरेंद्र देशमुख (Assistant Commissioner of Police Surendra Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक शैलेश संखे,
पोलीस उपनिरीक्षक सनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, सतीश भालेकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime Branch Police arrested criminal who abscond from 7 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi | पंतप्रधान मोदींनी UNSC मध्ये सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी जगाला सांगितली 5 तत्त्वे; जाणून घ्या

Weight Loss with Owa | ‘या’ जबरदस्त ड्रिंकमुळे काही आठवड्यातच कमी होईल वजन, गायब होईल चरबी

Rama Mahto | सापाने दंश केल्याने संतापलेल्या जेष्ठाने सापाला चावा घेऊन केले ठार, म्हणाला – तुझी हिंमत कशी झाली…