Pune Crime Branch Police | आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या पत्नीपाठोपाठ मुलाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  खंडणी, फसवणूक आणि मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या (rti activist ravindra barate) मुलाला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Crime Branch Police) आज (गुरूवार) सायंकाळी अटक (Arrest) केली आहे. याबाबत विश्वसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Crime Branch Police) बुधवारी सायंकाळी रवींद्र बर्‍हाटेची पत्नी संगीता बर्‍हाटे (Sangita Barate) यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज बर्‍हाटेच्या मुलाला अटक केली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. pune crime branch police arrested rti activist ravindra barate’s son mayuresh barate today

Join our Whatapp groupTelegramfacebook page and Twitter for every update

मयुरेश रवींद्र बर्‍हाटे (Mayuresh Ravindra Barate) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
खंडणी, फसवणूक प्रकरणी रवींद्र बर्‍हाटे (Ravindra Barate) आणि त्याच्या इतर साथीदारांविरूध्द शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
त्यामध्ये काही जणांवर एक इतर इतर काही साथीदारांविरूध्द एकापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे दाखल असलेल्यांमध्ये बडतर्फ पोलिस शैलेश जगताप (dismissed police shailesh jagtap pune) , पत्रकार देवेंद्र जैन (devendra jain journalist) , सांगलीचे संजय भोकरे
(Sanjay Bhokare Sangli) , जयेश जगताप (Jayesh Jagtap) , परवेझ जमादार
आणि इतरांचा समावेश आहे. खंडणी आणि फसवणूकीचे (Ransom and fraud) गुन्हे दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) काही जणांना अटक केली होती.
रवींद्र बर्‍हाटे (Ravindra Barate) गेल्या अनेक महिन्यांपासुन फरार आहे.

पुणे पोलिस त्याचा युध्दपातळीवर शोध घेत आहेत. दरम्यान, बर्‍हाटेची पत्नी त्याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Crime Branch Police) बुधवारी सायंकाळी बर्‍हाटेची पत्नी संगीता बर्‍हाटे (Sangita Barate) यांना अटक केली.
मयुरेश बर्‍हाटे हा देखील रवींद्र बर्‍हाटेच्या (Ravindra Barate) संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
त्याच्या सखोल चौकशीसाठी आणि इतर तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी मयुरेश बर्‍हाटेला अटक केली आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) , सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Joint Commissioner of police Dr Ravindra Shisve), गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale) उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shreeniwas ghatge) , सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख (assistant commissioner of police surendra deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी मयुरेश बर्‍हाटेला अटक केली.
त्याच्याकडे सखोल चौकशी चालु असून आतातरी जास्त काही माहिती देता येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

फरार असलेल्या रवींद्र बर्‍हाटेचा मुलगा मयुरेश बर्‍हाटेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यामुळे शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
रवींद्र बर्‍हाटेचा देखील युध्दपातळीवर शोध घेतला जात असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

आरोपींना मदत करणे, आरोपींची माहिती असताना देखील ती पोलिसांना न देणे,
अप्रत्यक्षपणे आरोपींना मदत केल्याप्रकरणी मयुरेश रवींद्र बर्‍हाटेला अटक करण्यात आल्याची माहिती
आता समोर आली आहे.

Web Title : pune crime branch police arrested rti activist ravindra barate’s son mayuresh barate today

Join our Whatapp groupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील कोंढवा-एनआयबीएम रोडवर अपघात; लस घेण्यास निघालेल्या 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू