Pune Crime Branch Police | वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, स्वतःच्या सोसायटीच्या पार्किंगमधूनही…

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  शहरातील विविध भागात वाहन चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) पथकाने सापळा रचून अटक केली आहे. विशेष म्हणजे त्याने राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधूनच दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली असून, आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. pune crime branch police arrests vehicle thief

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अक्षय दिपक पाठक (वय 26 रा. दत्तवाडी) Akshay Deepak Pathak असे अटक केलेल्याचे नाव आहे. अक्षय पाठक सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी 5 गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान शहरात दररोज 3 वाहने चोरीला जात आहे.
त्यामुळे वाहन चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जातो.
अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
पण चोरटे आपली कामगिरी पार पाडत आहेत.
त्यामुळे या वाहन चोऱ्या करणाऱ्याकडे विशेष लक्ष केंद्रित करत या घटना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

त्यानुसार गुन्हे शाखेचे (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथक गस्त घालत असताना त्यांना दत्तवाडी परिसरात (Dattawadi Area) एकजण चोरीची दुचाकी घेऊन फिरत आहे.
त्यानुसार पथकांने त्याला सापळा रचून अटक केली.
त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत दिली.
त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्याने ही दुचाकी दत्तवाडी येथूनच चोरी केली असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.
त्याला पुढील करवाइसाठी दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
त्याच्यावर खडक (Khadak Police Station), स्वारगेट (Swargate Police Station) आणि दत्तवाडी (Dattawadi Police Station) पोलीस ठाण्यात गुन्हे (FIR) दाखल आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge), सहाय्यक आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील (senior police inspector vittal patil), सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबसे,
मधुकर तुपसौंदर, रविंद्र फुलपगारे, रमेश चौधर, नितीन कांबळे,गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : pune crime branch police arrests vehicle thief

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुण्यातील ‘या’ हॉस्पीटलमध्ये स्पुटनिकची लस उपलब्ध; पहिल्या डोसनंतर दुसरा फक्त 21 दिवसानंतर, जाणून घ्या किंमत