Pune Crime Branch Police | पुण्यातील व्यवसायिकांना ब्लॅकमेलिंग ! गुन्हे शाखेकडून ‘सम्यक’ पत्रकार संघाच्या अध्यक्षासह 3 रिपोर्टरला 2 लाखाची खंडणी घेताना अटक, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Police Crime Branch | पुण्यातील व्यवसायिकांना ब्लॅकमेलींग करुन खंडणी उकळणाऱ्या तीन पत्रकारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने सापळा (Pune Crime Branch Police) रचून अटक केली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये सम्यक संपादक पत्रकार संघाच्या महाराष्ट्र अध्यक्षाचा समावेश आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.27) मार्केटयार्ड (Market yard) येथील जी.एस. टॉवर जवळ करण्यात आली.

सम्यक संपादक पत्रकार संघाचा अध्यक्ष सुहास मारुती बनसोडे (वय-40 रा. अॅरस्टोक्रेट सोसायटी,
सी बिल्डिंग, फ्लॅट नं. 1, सपना पावभाजी हॉटेल जवळ, कोंढवा बुद्रुक), मोईन लाडलेसाहेब चौधरी
(वय-45 रा. शेलार चाळ, इराणी मार्केटच्या मागे, येरवडा), वसिम अकबर शेख (वय-22 रा. लक्ष्मीनगर, उर्दु स्कूलच्या मागे, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी योगेश नवनाथ शिंदे (वय-31 रा. उरळी देवाची पोलीस चौकी मागे, सासवड रोड, उरळी देवाची) यांनी खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे येरवडा येथील एका गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. गॅस एजन्सीमधील सिलिंडरच्या टाक्या ग्राहकांना घरपोच केल्या जतात.
मात्र काही ग्राहक एजन्सीमध्ये थेट येऊन सिलिंडेरच्या टाक्या घेऊन जातात.
आरोपी मोईन चौधरी आणि वसिम शेख या दोघांनी गॅस एजन्सीमध्ये येऊन ग्राहक सिलिंडर
टाक्या घेऊन जात असतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढले.
तसेच फिर्यादी यांना एजन्सीमधून सिलिंडरचे वितरण करु नका असे सांगितले.

 

आरोपींनी या प्रकरणाची तक्रार इंडियन ऑईल कंपनीला केली होती.
त्यानुसार कंपनीच्या सेल्स ऑफिसर स्वाती उडुकले यांनी एजन्सीमध्ये येऊन पाहणी केली.
दरम्यान, सम्यक संपादक पत्रकार संघाचा महाराष्ट्र अध्यक्ष सुहास बनसोडे याने तक्रारदार
यांना फोन करुन भेटण्यास बोलावले. तक्रारदार आणि त्यांचे सहकारी आशिष कळमकर हे दोघेजण बनसोडेच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाखाची खंडणी मागून दर महिन्याला पाच हजार रुपयांचा हप्ता मागितला.

तक्रारदार यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथक दोनकडे केल्यानंतर पथकाने तक्रारदार यांच्याकडे काही खऱ्या आणि काही लहान मुलांच्या खेळ्यातील नोटा असे एकून दोन लाख रुपये दिले.
तक्रारदार यांच्याकडून आरोपींना दोन लाख रुपये स्विकारताना सापळा रचलेल्या पथकाने तिघांना रंगेहाथ पकडून अटक केली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अमलदार संपत अवचरे, प्रदिप शितोळे, विजय गुरव,
सौदाबा भोजराव, शैलेश सुर्वे, विनोद साळूंके, सचिन अहिवळे, अमोल पिलाणे, संग्राम शिनगारे, राहुल उत्तरकर, जगदाळे,
प्रविण पडवळ, प्रदिप गाडे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर व आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime Branch Police | Blackmailing to businessmen in Pune! 3 reporters, including the president of the ‘Samyak’ patrakar sangh arrested by the crime branch while taking a ransom of Rs 2 lakh, huge uproar; Learn the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Crime | PMPML बसची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एकजण जखमी

Biodiesel | आता शिल्लक खाद्यतेलाद्वारे तयार बायो-डिझेलवर धावणार तुमची कार, डिझेलपेक्षा 40 टक्के ‘स्वस्त’, जाणून घ्या

Pune Corporation | चोवीस तास पाणी पुरवठा योजना ! ‘एस.जी.आय.’ सल्लागार कंपनी प्रकल्पातून बाहेर पडली, नवीन सल्लागार नेमण्याचा खर्च वाढला