pune crime branch police | खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गेल्या 7 वर्षापासून फरार असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या सात वर्षापासून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार (abscond in attempt to murder) असलेल्या एका गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (pune crime branch police) सापळा रचून अटक  केली आहे. शंकर मनोहर कांबळे (वय 33, रा. वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

शंकर कांबळे हा गेली सात वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता.
त्याच्यावर लोणीकंद पोलीस  (Lonikanda Police) ठाण्यात 2014 मध्ये एक खुनाच्या प्रयत्नाचा (attempt to murder) गुन्हा दाखल आहे.
यानंतर तो पसार झाला होता.
तो नावे बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता.
यादरम्यान गुन्हे शाखेच्या (pune crime branch police) युनिट सहाला शंकर हा ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांना त्यांच्याबाबत माहिती मिळाली.
यानुसार त्याची खातरजमा करण्यात आली.
त्यावेळी त्याला सापळा लावून केसनंद रोडवर पकडले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
त्याला पकडून पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आधील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे – 2) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -6 चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, नितीन मुंडे, शेखर काटे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे , नितीन धाडगे यांनी केली आहे.

Web Title : pune crime branch police | crime branch arrest criminal who abscond from seven years in attempt to murder

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

woman dead body found in pune | पुण्यात आणखी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ