Pune Crime Branch Police | गेल्या आठ वर्षापासून वेगवेगळया 8 गुन्हयात फरार असलेल्या गुन्हेगारास गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch Police | गेल्या आठ वर्षापासून वेगवेगळया गंभीर अशा 8 गुन्हयांमध्ये फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्हयात आता त्याला अटक (Pune Crime Branch Police) करण्यात आली आहे.
दयानंद झा असे अटक केलेल्याचे नाव आहे. कोंढवा (Kondhwa) परिसरात 8 वर्षापुर्वी त्याने एक गोडाऊन फोडले होते. गेल्या अनेक वर्षापासून फरार असलेला दयानंद झा हा पुन्हा पुण्यात आला असून सध्या त्याचे वास्तव्य चिखली (Chikhali) आणि पिंपरी (Pimpri) परिसरात असल्याची माहिती पोलिस हवालदार राजस शेख (Polie Havaldar Rajas Shaikh) यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve), अप्पर आयुक्त अशोक मोराळे (Addl CP Ashok Morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Crime Shrinivas Ghadge), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector (Jayant Rajurkar), सहाय्यक निरीक्षक शोभा क्षिरसागर, पोलिस हवालदार राजस शेख, दिपक भुजबळ, प्रविण भालचिम, प्रविण कराळे, चालक पोलिस हवालदार शितल शिंदे यांच्या पथकाने आरोपीची माहिती काढली. आरोपी पिंपळे सौदागर येथील कृष्णा चौकात येणार असल्याचे समजल्यानंतर त्यास सापळा रचुन अटक करण्यात आली.
दयानंद उर्फ दुर्गानंद झा याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने पुण्यात गंभीर गुन्हे केल्यानंतर बिहारला पळून गेले असल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडे सखोल तपास सुरू आहे.
Modi Government | मोदी सरकारकडे सरकारी संपत्ती विक्री करण्याची मोठी यादी तयार !