Pune Crime Branch Police | पुण्यात अवैधरित्या सावकारी करणार्‍या दिग्दर्शकास गुन्हे शाखेकडून अटक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch Police) अवैधरित्या सावकारी करणाऱ्या दिग्दर्शक व नाट्य लेखक असणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्याने रावेतमधील खासगी रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाकडून व्याजापोटी लाखो रुपये घेतले आहेत. पुण्याच्या गुन्हे शाखेतील (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथक – 2 ने त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी शंतनू वसंत पांडे (वय 45, रा. वारजे) असे अटक केलेल्या या दिग्दर्शक (Director Shantanu Vasant Pandey) व नाट्य लेखकाचे नाव आहे.
याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रविराज साबळे (वय 36) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारदार रावेतमधील (Ravet) खासगी रुग्णालयात पीआरओ (PRO) म्हणून गेली सहावर्षापासून काम करतात. दरम्यान त्यांना व त्यांच्या पत्नीला आजार झाला होता.
त्याला महिना 28 हजार रुपये खर्च येत होता. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती.
त्यांना पैश्यांची आवश्यकता असल्याने त्यांनी 2018 मध्ये मित्राकडे पैसे मागितले.
तर सांगवी येथील एका मित्राने त्यांना शंतनू पांडे हा व्याजाने पैसे देत असल्याचे सांगितले.
त्यानुसार त्यांनी पांडे याची भेट घेतली. त्याने मागितले. पांडे पैसे देण्यास तयार झाला.
त्यानंतर हमीकरारनामा करत हात उसने म्हणून 6 लाख रुपये 5 टक्के व्याजाने पैसे दिले होते.
त्याबदल्यात फिर्यादी यांनी त्याला व्याज व मुद्दल असे 7 लाख 40 हजार रुपये दिले होते.
तरीही तो फिर्यादी यांच्याकडे 7 लाख 20 हजार रुपये देण्यासाठी मागत होता. तसेच त्याने पैसे न दिल्यास शिवीगाळ करत व कुटुंबाला त्रास देईल असे धमक्या देत.
तर दररोज 2 हजार रुपये द्यावे लागतील अश्या धमक्या देत होता.

याबाबत रविराज यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती.
त्यानुसार पथकाने गुन्हा दाखल करत पांडे याला अटक केली आहे.
या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
पांडे याचे हिंदी चित्रपट दिग्दर्शक व नाट्य लेखक असल्याचे प्रोफाइल आहे.
त्याबाबत अधिक माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta), अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge), सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (assistant commissioner of police laxman borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (senior police inspector balaji pandhre), उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, संपत अवचरे, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, भूषण शेलार, मोहन येलपल्ले, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Crime Branch Police | Crime Branch arrests moneylender in Pune

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Corona Vaccination | 18 वर्षांखालील देखील मुलांचं लसीकरण होणार; केंद्र सरकारची माहिती

Pooja Chavan Suicide Case | पोलिसांकडून संजय राठोडांना ‘क्लिन चिट’ देण्याचा संबंधच नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

T20 World Cup | भारत-PAK मध्ये होणार जोरदार टक्कर, UAE आहे तयार, दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये