Pune Crime Branch Police | 2 वर्षापासून फरार असलेल्या मारणे टोळीतील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – बोपदेव घाटात (Bopadev Ghat) महंमद कुरेशी व अंजली राठोड या दोघांना मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने (Gold jewelry) चोरुन फरार झालेल्या मारणे टोळीतील (marne gang) दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पोलीस दोन वर्षापासून शोध घेत होते. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा (Pune Crime Branch Police) युनिट एकच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.30) सकाळी अकराच्या सुमारास घोटावडे फाटा येथील मुळशी चायनिज सेंटर येथे केली. गुन्हे शाखा (Pune Crime Branch Police) युनिट एकच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवई केली. या गुन्ह्यात संकेत मारणेसह तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. ही घटना 29 ऑगस्ट 2019 रोजी घडली होती.

अभिषेक ऊर्फ नन्या उदय मारणे (वय -21 रा. मंदिराजवळ मु पो माळेगाव ता. मुळशी जि.पुणे), अक्षय अशोक सावले (वय-23 रा. गणेश मंदीराजवळ मुपो खामबोली ता. मुळशी जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महंमद वसीम महंमद सलीम कुरेशी (रा. 399 कोळसा गल्ली, कॅम्प, पुणे) यांनी संकेत मारणे, सुरज जाधव, राम गायकवाड व इतर 5 ते 6 अनोळखी व्यक्तींविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात नन्या मारणे आणि अक्षय सावले हे 2019 पासून फरार होते.

शुक्रवारी (दि. 30) गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार सचिन जाधव व दत्ता सोनावणे यांना
या गुन्हयातील पाहिजे आरोपी आरोपी अभिषेक ऊर्फ नन्या मारणे हा घोटावडे फाटा येथे मित्रासह येणार असल्याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसानी मुळशी चायनिज सेंटर येथे सापळा रचला.

अकराच्या सुमारास दोन जण मुळशी चायनिज सेंटरमध्ये आले.
त्यांची हालचाल संशयास्पद असल्याचे दिसून आली.
त्यांना पळून जाता येणार नाही अशी व्हयुरचना करुन पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड यांनी ‘काय अभिषेक’ असा आवाज दिला असता त्याने पाहिले व त्याला पोलीस असल्याचा संशय आला.
दोघेजण पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे वरील दाखल गुन्ह्याबाबत एकत्रित व स्वतंत्रपणे सखोल चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा इतर साथीदारासह केल्याचे कबुल केले.
आरोपींना पुढील कार्यवाहीकरीता त्यांची वैद्यकीय व कोवीड-19 ची वैद्यकीय तपासणी करुन कोंढवा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale),
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-1 सुरेंद्र देशमुख (Assistant Commissioner of Police Surendra Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe)
यांच्या सुचनेनुसार पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सुशिल जाधव (Police Sushil Jadhav), दत्ता सोनावणे, विजयसिंह वसावे, अशोक माने, शशीकांत दरेकर, आय्याज दड्डीकर, महेश बामगुडे, मिना पिंजण यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime Branch Police | Crime Branch arrests two members of Marane gang who have been absconding for 2 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग उपयोगी पडतील ‘या’ 5 होम लोन टिप्स

Nakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे ‘नखरा’ झाला आऊट, इलाक्षी गुप्ताच्या ठुमक्यांनी होऊन झालं हक्का बक्का

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी