Pune Crime Branch Police | मित्रासोबत फिल्मी स्टाईल ‘एक एकाच्या डोक्यात कोयते अडकवणार’ म्हणणारा अटकेत

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – मित्रासोबत फिल्मी स्टाईल ‘एक एकाच्या डोक्यात कोयते अडकवणार’ म्हणणाऱ्या ‘त्या’ तरुणाच्याच ‘डोक्यावर’ पोलिसांनी हात ठेवत त्याच्या हातात बेड्या घातल्या आहेत. तर असले उद्योग करणाऱ्यावर पोलिसांनी बारीक नजर ठेवली असल्याचेही दिसत आहे. Pune Crime Branch Police | crime branch of pune police arrest criminal

अनिकेत विकास साठे (वय 20, रा. चंदननगर) असे अटक (Arrest) केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

शहरात जुन्या भाईंचा बंदोबस्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी केला. पण, गल्ली बोलत नवीन तरुणाई या भाईं होण्याच्या मोहात अडकत चालली आहे. त्यामुळे पोलीस त्याला वेळीच आवर घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर उगाच फेसबुक आणि व्हाट्सअपला स्टेट्स ठेवत भूषारक्या मारणाऱ्याना पोलिसी खाक्या दाखवत वठणीवर आणत आहेत.

यादरम्यान गुन्हे शाखेच्या (Crime Branch) युनिट चारला माहिती मिळाली की,
अनिकेत साठे हा मुलांना सोबत घेऊन धमक्याचे व्हिडीओ तयार करून तो व्हाटसअप स्टेट्सला ठेवत असतो.
तो सध्या पाण्याच्या टाकीजवल थांबला आहे.
त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशी केली असता त्याने उगाच दहशतीसाठी तो असले उद्योग करत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
त्याच्यावर यापूर्वीचा एकही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Srinivasa Ghadge), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (Assistant Commissioner of Police Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil), सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे (Assistant Police Inspector Sandeep Jamdade), व त्यांच्या पथकातील गणेश साळुंखे, राजश शेख, कौस्तुभ जाधव, सुरेंद्र साबळे आणि स्वप्नील कांबळे याच्या पथकाने केली आहे.

Advt.

Web Titel :- Pune Crime Branch Police | crime branch of pune police arrest criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक