पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमपी चालकाच्या (PMPML Driver) खुनाचा उलगडा करण्यात पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना (Pune Crime Branch Police) यश आले असून, कोर्टात एकाला जामीन राहिल्यामुळे आणि घटनेच्या वेळी दारू पिण्यास बसल्यानंतर झालेल्या वादामुळेच त्याचा खून (Murder) करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेने (Pune Crime Branch Police) कसलाही पुरावा नसताना 24 तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
ऋषिकेश संजय बोरगावे (वय 31), अक्षय हनुमंत जाधव (वय 21), प्रज्वल सचिन जाधव (वय 20) आणि तुषार सूर्यकांत जगताप (वय 21) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. तर अन्य एक आरोपी फरार आहे. या घटनेत गौतम उर्फ अमोल मच्छिंद्र साळुंखे (वय 29) यांचा खून झाला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
गौतम उर्फ अमोल साळुंखे हे पीएमपी चालक होते. ते गेल्या चार वर्षांपासून नोकरी करत होते.. शनिवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. दरम्यान, रविवारी सकाळी लोणी काळभोर परिसरात त्यांचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर ओळख पटविण्यात आली असता ते पीएमपी चालक असल्याचे समोर आले. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी लागलीच या गुन्ह्याचा तपासाला सुरुवात केली. गुन्हे शाखेची पथके समांतर तपास करत होती.
युनिट सहाचे पोलीस नाईक नितीन मुंडे व नितीन शिंदे यांनी हडपसर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यावेळी हा गुन्हा ऋषिकेश बोरगावे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्याबाबत तपास केल्यानंतर ते खून करूनउस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे पळून गेल्याचे समजले. त्यानुसार पथकाने त्यांना तेथील लॉजमधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
गौतम उर्फ अमोल साळुंखे आणि आरोपी बोरगावे हे एकच गावचे आहेत. बोरगावे याचे गावात भांडण केले होते. त्यात गुन्हा दाखल करत बोरगावे यांना मारहाण करणाऱ्या आरोपीना अटकही झाली होती. त्यात मात्र गौतम उर्फ अमोल हे त्या आरोपीना जामीन राहिले होते. त्याचा राग बोरगावे याच्या मनात होता. यावरून त्यांच्यात वाद देखील झाला होता. दरम्यान, शनिवारी रात्री सर्वजण एकत्र दारू पिण्यास बसले. त्यांना गौतमला बेदम मारहाण करण्याची होती. पण दारूच्या नशेत त्यांनी बेदम मारहाण करत डोक्यात दगड घालून गौतमचा खून केला.
ही कारवाई अप्पर आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale),
उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge),
सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (assistant commissioner of police laxman borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (Assistant Police Inspector Narendra Patil),
पोलीस कर्मचारी मच्छिंद्र वाळके, नितीन मुंडे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
Web Title : Pune Crime Branch Police| Crime branch police solve murder case of pmpml driver, arrest four
- हे देखील वाचा
- Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्याच्या हाताचा घेतला चावा
- Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज ! ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन, जाणून घ्या कधी आणि कसे?
- Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ
- Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका, बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे