Pune Crime Branch Police | विमानतळ, कोंढवा, हडपसरमधील 12 अवैध धंद्यावर गुन्हे शाखेकडून छापा; 11 गुन्हयात 2 लाख 7 हजाराचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात अवैधरित्या दारु व अंमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. गुन्हे शाखेने (Pune Crime Branch Police) विमानतळ (Viman Nagar), कोंढवा (Kondhwa), हडपसर (Hadapsar) या फक्त तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवसात तब्बल 12 ठिकाणी कारवाई केली आहे. दारु विक्री, हुक्का पार्लर व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या बाबत 11 गुन्हे दाखल केले असून 2 लाख 7 हजार 573 रुपयांचा माल जप्त केला आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा दारु विक्री होत असून अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांना मिळाली होती. त्यानुसार आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge) यांना कारवाईचे आदेश दिले.

गुन्हे शाखेतील 2 पोलीस निरीक्षक, 24 उपनिरीक्षक व पोलीस मुख्यालय तसेच गुन्हे शाखेकडील 32 अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली.
त्यांनी एकाच वेळी विमानतळ, कोंढवा व हडपसर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले.
त्यात 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून 15 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title : Pune Crime Branch Police | Crime Branch raids 12 illegal businesses in Airport, Kondhwa, Hadapsar; 2 lakh 7 thousand goods seized in 11 cases

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | कोरोनाच्या नावाखाली वसुलीचे टार्गेट म्हणजे ‘तुघलकी’ कारभार, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांचा प्रशासनावर हल्लाबोल

RBI Alert | जुनी नाणी किंवा नोटांची विक्री करण्यापूर्वी व्हा सावध, RBI ने जारी केली महत्वाची सूचना

7th Pay Commission | 31 टक्के DA झाल्यास सॅलरीत होईल जबरदस्त वाढ, जाणून घ्या गणित