Pune Crime Branch Police | बेकरी कामगाराने मौजमजेसाठी चोरल्या शहरातील दुचाकी, गुन्हे शाखेकडून 8 गुन्हयांची उकल

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  बेकरी कामगार मौजमजेसाठी शहरातील विविध भागात दुचाकी चोरत (Bike thief) असल्याचे प्रकरण गुन्हे शाखेच्या पथकाने (Pune Crime Branch Police) समोर आणले आहे. त्याच्याकडून 8 गुन्हे उघड आणत 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. Pune Crime Branch Police | eight bikes stolen by bakery workers for fun, 8 cases solved by crime branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

शाहवेज शहजाद अन्सारी (वय 25, रा. लष्कर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शाहवेज अन्सारी हा पुण्यातील लष्कर भागातील एका नामांकित बेकरीत कामगार आहे.
दरम्यान तो मूळचा उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) नगिना बीजनोर येथील आहे.
गेल्या काही वर्षांपासून पुण्यात आहे. दरम्यान शहरात दररोज वाहने चोरीच्या घटना घडत आहेत.
पार्किंगला लावलेल्या दुचाकी आणि काही घटनात मोठी वाहने देखील चोरी होत आहेत.
या घटना काही केल्या तरी रोखल्या जात नसल्याचे वास्तव आहे.
दरम्यान या घटना रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत.
यादरम्यान युनिट सहाचे पथक एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते.
कर्मचारी सचिन पवार, ताकवणे व व्यवहारे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की,
ही दुचाकी चोरणारा लष्कर भागात फिरत आहे.
त्यानुसार पथकाने सापळा रचून अन्सारी याला सापळा रचून अटक केली.

त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
सखोल तपासात त्याने कोंढवा, वानवडी, लोणी काळभोर, शिक्रापूर यासह 8 ठिकाणावरून दुचाकी चोरल्या असल्याचे उघडकीस आले.
या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या आठही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (Upper Commissioner of Police Ashok Morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner Srinivasa Ghadge), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (Assistant Commissioner Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, मच्छीन्द्र वाळके,
नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Crime Branch Police | eight bikes stolen by bakery workers for fun, 8 cases solved by crime branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | उच्चशिक्षीत तरूणाला इंग्लंडमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेचार लाखांची फसवणूक