Pune Crime Branch Police | कोकेन बाळगणाऱ्या नायजेरियनला अटक, 4 लाखाचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका नायजेरियन नागरिकाला पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) अमली पदार्थ विरोधी पथक (anti narcotics cell) एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या नायजेरियन (Nigerian) नागरिकाकडून 4 लाख 15 हजार 850 रुपये किमतीचे 20 ग्रॅम 160 मिलीग्रॅम कोकेन (Cocaine) जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी ही कारावाई चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (chaturshringi police station) हद्दीत मंगळवारी (दि. 27) केली आहे.

शुएब तौफिक ओलाबी (Shuaib Taofiq Owolabi) (वय-40 रा. झु व्हिलेज वाशी, नवी मुंबई मुळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshrungi Police Station) हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी बाणेर येथील अन्नपूर्णा हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर एक नायजेरियन नागरिक कोकेन विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शुएबला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ कोकेन आढळून आले.

Pune Crime Branch Police | Nigerian arrested for possession of cocaine

आरोपी विरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस उप निरीक्षक सुजित सुनिल वाडेकर (Sujit Sunil Wadekar) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे. पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे पोलीस उपनिरीक्षक डी.एल. चव्हाण करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh
Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint Commissioner of Police Dr.
Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (Additional Commissioner
of Police Ashok Morale), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner
of Police Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख (Assistant
Commissioner of Police Surendra Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली
पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak
Gaikwad), पोलीस अंमलदार प्रविण शिर्के, सुजित वाडेकर, संदिप जाधव, राहुल जोशी, प्रविण
उत्तेकर, नितीन जाधव, पांडुरंग पवार, संदेश काकडे यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदी 1000 रुपयांनी ‘स्वस्त’ झाली, जाणून घ्या आजचे दर

Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime Branch Police | Nigerian arrested for possession of cocaine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update