Pune Crime Branch Police | सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व काडतुस जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 3 (Pune Crime Branch Police) च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल (Pistol) व एक राऊंड असा एकूण 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Crime Branch Police) ही करवाई गुरुवारी (दि.19) वेदांती फॅमिली गार्डन रेस्टॉरंट व बार जवळील सार्वजनिक रोडवर करण्यात आली.

रोहन बाळासाहेब गबदुले (वय-27 रा. मारुती मंदिराशेजारी, किरकिटवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपाचे नाव आहे. आरोपी हा हवेली पोलीस ठाण्याच्या (Haveli Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. आरोपी विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या (warje malwadi police station) हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस शिपाई दिपक क्षिरसागर (Deepak Kshirsagar) यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहन गबदुले हा वेदांती रेस्टॉरंटच्या समोरील सार्वजनिक रोडवर उभा असून त्याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे (Addl CP Ashok Morale),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख (ACP Surendra Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे,
पोलीस अंमलदार सहायक पोलीस फौजदार निंबाळकर, पोलीस हवालदार संतोष क्षिरसागर,
पोलीस नाईक कल्पेश बनसोडे, प्रकाश कटटे, सुजित पवार,
महिला पोलीस शिपाई भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime Branch Police | Pistol and cartridges seized from Sarait criminals, action taken by Crime Branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील आर्मी स्टेडियमला ‘ऑलिम्पिक गोल्ड मेडल’ जिंकणार्‍या नीरज चोप्राचं नाव

Remove Darkness | शॉर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस परिधान करण्यास लाज वाटते; ‘या’ टिप्स वापरुन बघा

Pune Crime Branch Police | घरफोडी करणाऱ्या सख्ख्या भावांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 9 लाखांचा ऐवज जप्त