Pune Crime Branch Police | पुण्यात भरदिवसा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 10 लाखाचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime Branch Police | पुणे शहरात दिवसाढवळ्या बंद घरामध्ये घरफोडी (burglary) करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीला (interstate gang) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 (Pune Crime Branch Police) च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली अत्याधुनिक हत्यारे असा एकूण 10 लाख 9 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

साकिब शौकतअली अन्सारी (वय-23 रा. नागपूर चाळ, येरवडा, मुळ रा. मेहस्त्री, ता. कोतवाली, उत्तरप्रदेश), दानिश वारीस शेख (वय-22 रा. नागपूर चाळ, येरवडा मुळ रा. मेरठ गर्ल्स कॉलेजजवळ, ता. मेरठ, उत्तरप्रदेश), सलमान ऐहसान अलवी (वय-26 रा. येरवडा मुळ रा. कल्याणपूर, ता नगिना उत्तरप्रदेश), रिक्षाचालक वसिम शौकतअली अन्सारी (वय-24 रा. येरवडा, मुळ. रा. तेवडीमंजाळा, पोस्ट तेवडी, ता. धामपूर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. आरोपींना 24 ऑगस्ट रोजी दरोड्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने सेनापती बाबट रोडवर (Senapati Babat Road) अटक केली होती.

आरोपींची पोलीस कोठडी (police custody) घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली.
चौकशी दरम्यान आरोपींनी दिवसा घरफोडी केलेल्या बाणेर आणि पाषाण येथील ठिकाणे दाखवली.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून गुन्ह्यातील सोन्या-चादीचे दागिने रोख रक्कम 9 लाख 8 हजार आणि दरोड्यासाठी लागणारे
1 लाख 1 हजार 340 रुपयांचे साहित्य असा एकूण 10 लाख 9 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint Commissioner Dr Ravindra Shisve),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar)
यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षिरसागर (API Shobha Kshirsagar),
पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaideep Patil), पोलीस अंमलदार महेंद्र पवार,
राजस शेख, दिपक भुजबळ, शितल शिंदे, विशाल शिर्के, दत्ता फुलसुंदर, अशोक शेलार, प्रविण भालचिम,
राकेश खुणवे, कौस्तुभ जाधव, प्रविण कराळे, सुरेंद्र साबळे, स्वप्निल कांबळे, संजय आढारी, रमेश राठोड, सागर वाघमारे यांनी केली.

Web Title : Pune Crime Branch Police | pune crime branch police arrested Inter state gang in pune, seizes Rs 10 lakh