Pune Crime Branch Police | पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला भरदिवसा लुटणार्‍या 5 जणांवर ‘मोक्का’; आयुक्त अमिताभ गुप्तांकडून 37 वी कारवाई

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – वानवडी येथील पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला भरदिवसा हत्याराचा धाक दाखवून पावणे नऊ लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीवर मोक्कानुसार कारवाई (MCOCA Action) केली आहे. त्यांना नुकतीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Crime Branch Police) अटक (Arrest) केली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांनी मोक्का कारवाईचे आदेश (MCOCA Action Order) दिले आहेत. आयुक्तांचा हा 37 वा मोक्का आहे. pune police commissioner amitabh gupta ordered MCOCA on 5 criminals in robbery case

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अरबाज नवाब पठाण (वय 19), तालीम आस मोहम्मद खान (वय 20), उबेद अन्सार खान (वय 30), प्रज्योत कानिफनाथ झांबरे (वय 20), अजीम उर्फ आंट्या मोहम्मद हुसेन शेख (वय 22) व
शाहरुख ऊर्फ आट्या रहीम शेख (वय 20) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वानवडी परिसरात एचपीचा पेट्रोल पंप आहे. येथे फिर्यादी बाळासाहेब अंभोरे हे मॅनेजर आहेत.
या पेट्रोल पंपावर दोन दिवसांची जमा झालेली 8 लाख 74 हजार रुपयांची रोकड घेऊन ते बँकेत भरण्यासाठी जात होते.
त्यावेळी या आरोपींनी भररस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत जबरदस्तीने ही रोकड हिसकावून नेली होती.
याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेचे युनिट पाचने या लुटीचा छडा लावत या 5 आरोपींना अटक केली होती.

आरोपी अरबाज खान, तालीम आसमोहम्मद खान आणि अरबाज पठाण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
या सर्वांची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असल्याने व त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने त्यांच्यावर मोक्कानुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) या टोळीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil) यांनी उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge) यांच्याकडे सादर केला होता.
त्यांनी या प्रस्तवाची छाननी केली. तसेच तो प्रस्ताव पुढील कारवाई करण्यासाठी अप्पर आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale) यांच्याकडे पाठवला होता.
त्यांनी या प्रस्तावाची पाहणी केली.
तर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीवर मोक्का कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोक्का तसेच एमपीडीए या कायद्याचा प्रभावी वापर करत सराईत गुन्हेगार आणि टोळ्यांना कारागृहात पाठवले आहे.
आतापर्यंत 36 टोळ्यांवर मोक्का लावला असून, ही 37 वी कारवाई ठरली आहे.
आयुक्तांच्या मोक्का कारवाईने मात्र गुन्हेगार व अवैध प्रकार करणाऱ्यामध्ये दहशत पसरली आहे.

Web Title : pune crime branch police | pune police commissioner amitabh gupta ordered MCOCA on 5 criminals in robbery case

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Sandal theft | खडकी अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीच्या जंगल परिसरातून 8 चंदनाच्या झाडांची चोरी