Pune News : बाणेर परिसरात मसाजच्या नावाखाली सुरू होतं सेक्स रॅकेट, सामाजिक सुरक्षाकडून पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  चतुःश्रुगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाणेर सारख्या उच्चभ्रू परिसरात मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. येथून परराज्यातील 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी के. बी. फुग्रेओ उर्फ माया (वय 29) हिला अटक केली आहे. तर स्पाची मालकीन नितु रोशा हिच्यावर चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनानुसार अवैध प्रकरणा आळा घातला जात आहे. गुन्हे शाखा जोरदार कारवाई करत आहेत. यादरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाला बाणेर परिसरात आराया स्पा अँड सलूनच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु आहे. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून याची खात्री करण्यात आली. त्यानंतर काल रात्री पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी येथून 3 महिलांची सुटका केली. या महिला मणिपूर व मिझोराम या राज्यातील आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर खडके, राजेंद्र कुमावत, आण्णा माने, संतोष भांडवलकर, राजश्री मोहिते, मनीषा पुकाळे यांनी केली आहे.