Pune : शहर गुन्हे शाखेतील ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन, उपायुक्तांनी केली कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  पोलीस चौकीत तक्रार देण्यास आलेल्या Covid सेंटरच्या डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. सचिन सिद्धेश्वर गायकवाड (Gaikwad) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सचिन व त्यांच्या भावावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सचिन गायकवाड (Gaikwad) हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनमध्ये कर्तव्यास आहेत.

Pune : लाच प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

बाणेर येथे महापालिकेचे डेडिकेटेड Covid सेंटर आहे. सोमवारी डॉ. अजयश्री सेंटरच्या कार्यालयात बसले होते. यावेळी एकजण त्याच्या कार्यालयात आला.

त्याने प्रवीण नावाचा रुग्ण भाचा असल्याचे सांगितले. तुम्ही आमचे फोन का उचलत नाही असे म्हणत डॉक्टर आणि तेथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.

कोरोनानंतर कोरडा खोकला अन् कफामुळं असाल परेशान तर ‘या’ टिप्सचा नक्की होईल फायदा; जाणून घ्या

तसेच मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणानंतर डॉ. अजयश्री हे इतर स्टाफ आणि महापालिकेच्या सिक्युरिटी गार्ड सोबत बाणेर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. येथील पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या प्रकाराची माहिती देत असताना येथे सागर गायकवाड आणि सचिन गायकवाड यांनी आत प्रवेश केला.

Pune : तरुणाचा गळादाबून आणि डोक्यात वार करून खून ! मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला; सिंहगड रोड परिसरातील घटना

तसेच, पुन्हा त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारे सिक्युरिटी ऑफिसर अजित गजमल यांनाही मारहाण केली होती.

याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर सचिन गायकवाड यांचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

 

6 कोटी नोकरदारांना मोदी सरकारची मोठी भेट ! पुढील महिन्यात PF खात्यात येतील जास्त पैसे, जाणून घ्या

Coronavirus : ‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, ‘या’ पद्धतीने कराव बचाव; जाणून घ्या