Pune Crime Branch | पुणे : 12 वर्ष फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून गुजरात येथून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यात सलग 12 वर्षे फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने गुजरात येथून अटक केली आहे. रहिम उर्फ वहिम अब्बास पटेल Rahim Alias Wahim Abbas Patel (वय-45 रा. अस्थान जिम कंपाऊंड, ता. बारडोली जि. सुरत गुजरात मुळ रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर 2012 मध्ये आयपीसी 498, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime Branch)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अभिलेखावरील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यतील फरार आरोपी वहीम पटेल याला न्यायालयाने वॉरंट काढले होते. मात्र तो मिळून येत नसल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषीत केले होते.

आरोपी वाहीम पटेल याचा शोध घेण्यासाठी युनिट पाचच्या पथकाने वानवडी परिसरात त्याचा शोध घेतला. त्याचे नातेवाईक, मित्र यांची माहिती काढली मात्र, काहीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, पोलीस अंमलदार राजस शेख यांना माहिती मिळाली की, फरार आरोपी वहिम पटेल हा नाव बदलून गुजरात राज्यातील बारडोली तालुक्यात राहत आहे. पथकाने 13 वर्षा पूर्वीचा आरोपीचा फोटो प्राप्त केला.

पोलिसांच्या पथकाने बारडोली येथे आरोपीचा घेऊन त्याला विरळ लोकवस्ती मधून ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे सखोल तपास केला असता 12 वर्षापासून पोलिसांच्या अटकेला घाबरून वेगवेगळ्या ठिकाणी स्वत:चे नाव
बदलून राहत असल्याचे सांगितले. आरोपीला पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, राजस शेख,
प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, पांडुरंग कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांनी दिला मतदारांना शब्द, म्हणाले – ”पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह फेडणार”

ACB Trap On Police Inspector | लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, संतप्त जमावाची पोलीस गाडीवर दगडफेक

Amol Kolhe On Eknath Shinde | भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी ! मुख्यमंत्र्यांना शिरुर मधून द्यायची होती, छगन भुजबळांना उमेदवारी; डॉ.अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट (Video)